येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – बंद दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ७५ हजारांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना ८ जूनला कल्याणीनगरातील फुड जंक्शन शॉपमध्ये घडली आहे. याप्रकरणी मांजरी परिसरात राहणार्या तरूणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मांजरी परिसरात राहायला असून, त्यांचे फुड जंक्शन नावाचे दुकान कल्याणीनगरमध्ये आहे. ८ जूनला हे दुकान बंद होते. चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील ७५ हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड तपास करीत आहेत.




















