सायबर फसवणुकीत तरुणाला पावणे पाच लाखांचा गंडा
marathinews24.com
पुणे – ऑनलाइन पद्धतीने घरातून काम करण्याची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाची ४ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बसस्थानकात महिलेचे १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. सुरुवातीला चोरट्यांनी त्याला ऑनलाइन पद्धतीने काम करण्यास दिले. या कामाचे पैसे तरुणाच्या खात्यात जमा करण्यात आल्याने तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी ऑनलाइन टास्कमध्ये आणखी रक्कम गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी चार लाख ७३ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर तरुणाला परतावा देण्यात आला नाही, तसेच चोरट्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तपास करत आहेत.