Breking News
मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यशाळा संपन्नपुण्यात बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा संताप; जाचक अटींच्या शासन निर्णयाची समाजकल्याण कार्यालयासमोर जाहीर होळी!आदिवासी विकास विभागांतर्गतच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये लवकरच २ हजाराहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरतीलोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’च्या निविदेचा मसुदा अंतिम; निविदा प्रसिद्धीचा मार्ग मोकळा!महिला आणि तरुणांचे पुरस्कर्ते, दुरदृष्टीचे नेते राजीव गांधींच्या विचारांची देशाला गरज – बी. संदीपबंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेशपुण्यात एमडी तस्करीच्या तयारीतील दोघांना अटकचाकण परिसराची कचराकोंडी फुटली; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्पप्रतिगामी शक्तींच्या विरोधात पेटून उठण्याची गरज: उल्हास पवारट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

महिला आणि तरुणांचे पुरस्कर्ते, दुरदृष्टीचे नेते राजीव गांधींच्या विचारांची देशाला गरज – बी. संदीप

महिला आणि तरुणांचे पुरस्कर्ते, दुरदृष्टीचे नेते राजीव गांधींच्या विचारांची देशाला गरज - बी. संदीप

‘राजीव गांधी स्मारक समिती’ तर्फे जयंती साजरी..!”

marathinews24.com

पुणे – भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आणि स्वतंत्र झाल्यानंतरही काँग्रेसने देशासाठी बलिदान दिले आहे. देशाच्या प्रगतीचा ज्याप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाया घातला त्यावर पुढे ‘आधुनिक क्रांतीचा’ पाया स्वर्गीय राजीव गांधी यांनी घातला. राजीव गांधी यांच्या विचारांवर वाटचाल करून त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. त्यांच्या सकारात्मक आणि विकसनशील विचारांची आजही देशाला गरज आहे, असे मत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी व महाराष्ट्राचे सह प्रभारी, बी. संदीप यांनी व्यक्त केले.

बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश – सविस्तर बातमी 

राजीव गांधी स्मारक समिती तर्फे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालया समोरील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी अ भा काँग्रेस महासमितीचे सेक्रेटरी व महाराष्ट्राचे सह प्रभारी बी संदीप बोलत होते. राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी स्वागत प्रास्ताविक केले.

बी. संदीप पुढे म्हणाले, संगणक क्रांतीचा पाया घालून राजीव गांधी यांनी आजच्या तरुण पिढीला रोजगार उपलब्ध करून दिले. राजीव गांधी यांचे योगदान आणि देशासाठी त्यांचे असणारे बलिदान आजच्या तरुण पिढीला माहिती करून दिले पाहिजे.

अ भा काँग्रेसच्या सचिव रेहाना चिस्ती आपल्या भाषणात म्हणाल्या, राजीव गांधी यांच्या सकारात्मक राजकारणामुळे संगणक क्रांतीचा जन्म झाला. राजीव गांधींचे विचार युवकांपर्यंत पोहोचवून त्यांना राजकारणामध्ये आणले पाहिजे. त्यांचे विचार आजही देशाला मार्गदर्शक आहेत.
पुणे शहर काँग्रेस’ पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दिप्ती चवधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात, दीप्ती चवधरी म्हणाल्या, गोपाळदादा तिवारी यांनी राजीव गांधी यांचा पुतळा बसविण्यासाठी घेतलेला पुढाकार निश्चितच स्तुत्य आहे. राजीव गांधी यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. राजीव गांधी यांच्यासारखा पंतप्रधान पुन्हा होणे नाही. त्यांना मिळालेल्या पंतप्रधान पदाच्या अल्प कालावधीमध्ये त्यांनी मोठे काम केले. त्यामुळेच संगणक आणि तंत्रज्ञान क्रांती घडू शकली. राजकारणामध्ये भाजपच्या नकारात्मक घुसखोरी राजकारणामुळे जे वातावरण निर्माण झाले आहे त्याला सकारात्मक दृष्टीने बदलण्यासाठी राजीव गांधी यांच्या विचारांची गरज आहे.

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा दळवी, सरचिटणीस राजेंद्र शेलार, समितीचे भोला वांजळे, संजय वावले इ नी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी उद्यान अघिक्षक राजकुमार जाधव, स्मारक समितीचे पदाधीकारी, सदस्य, जेष्ठ काँग्रेसजन सर्वंश्री सुर्यकांत मारणे, भाऊ शेडगे, नंदकुमार पापळ, कामगार नेते राजेंद्र खराडे, संजय अभंग, विवेक भरगुडे, सुभाष जेधे, लक्ष्मण तरवडे, अण्णा गोसावी, किशोर मारणे, भगवान कडू, धनंजय भिलारे, अण्णा गोसावी, ऍड श्रीकांत पाटील ,महेश अंबिके, गणेश मोरे, गणेश शिंदे, ऍड स्वप्निल जगताप, विकास दवे, नरसिंह आंबोली, राजेंद्र मगर, एडवोकेट ऍड फैयाज शेख ,हरिदास अडसूळ, अविनाश अडसूळ, राजेंद्र सुतार, बाळासाहेब पवार उदय लेले, गणेश गुगळे आदि यावेळी उपस्थित होते. सुभाष थोरवे यांनी आभार प्रदर्शन करून, राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×