Breking News
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठारजेष्ठाच्या मोबाइलचा ताबा घेउन ४ लाखांचा गंडाइमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून दोघे कामगार ठारजलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन-रन फॉर वॉटर ’साठी प्रशासन सज्जपुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६७ लाखांची फसवणूक‘धर्मस्वातंत्र्य’ कायदा लागू होण्यापूर्वी पुणे पोलिसांकडून कारवाईची घाई ?दुबईहून आलेला तरुण पुणे विमानतळावरुन बेपत्तानैराश्यातून बीडच्या खो-खो पटूची पुण्यात आत्महत्यापत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन-रन फॉर वॉटर ’साठी प्रशासन सज्ज

जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी २१ ऑगस्टला ‘महा-वॉकेथॉन’; पुणे पोलिस परेड ग्राउंडवर आयोजन

marathinews24.com

पुणे – जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ बनविण्याच्या उद्देशाने २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन – रन फॉर वॉटर २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील पोलीस परेड ग्राउंड, शिवाजीनगर येथे सकाळी ६ ते ९ या वेळेत होणाऱ्या या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, युवक, अधिकारी-कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

सहभागींचा उत्स्फूर्त सहभाग, सुरक्षितता व कार्यक्रमाचे सुरळीतपणे आयोजन होण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नोंदणीकृत सहभागींसाठी आकर्षक वॉकेथॉन टी-शर्ट, उन्हापासून संरक्षण तसेच कार्यक्रमाची एकसंध ओळख निर्माण होण्यासाठी टोपी, सहभाग चिन्ह, वॉकेथॉन मार्गावर सहभागींची सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण व शिस्त राखण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त, कार्यक्रमस्थळ, वॉकेथॉनचा मार्ग तसेच सहभागींच्या वापराच्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक स्वच्छता कर्मचारी व साधनसामग्रीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सहभागींसाठी मार्गावर तसेच कार्यक्रमस्थळी पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोंदणीकृत सहभागींसाठी कार्यक्रमानंतर नाश्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. वॉकॅथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींसाठी विविध वयोगट,प्रकारानुसार आकर्षक पारितोषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. कार्यक्रमस्थळी आवश्यक प्रवेश, नोंदणी, मार्गदर्शन, ध्वनी व्यवस्था व इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सहभागींसाठी वैद्यकीय सुविधा

सहभागींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे (संपर्क क्रमांक ८६६९०७९५१३) यांची नोडल अधिकारी म्हणून, तर विस्तार अधिकारी महेश वाघमारे (संपर्क क्रमांक ९९२३९३१८१८) यांची संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी आवश्यक आपत्कालीन वैद्यकीय साहित्य, प्रथमोपचार संच, औषधे तसेच रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.

सहभागी नागरिकांना आवश्यकतेनुसार तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी वैद्यकीय पथके कार्यरत राहणार आहेत.

कार्यक्रमासाठी दोन वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक पथकात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, वाहनचालक आणि परिचर यांचा समावेश आहे. पहिल्या पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. शब्दा शिरपूरकर (संपर्क क्रमांक
९२८४७३११८९), असणार आहेत.

दुसऱ्या पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता कदम (संपर्क क्रमांक ७३८५५५०६१५), हे असणार आहेत. उष्माघात, चक्कर येणे, दुखापत, रक्तदाब इत्यादी संभाव्य बाबींसाठी आवश्यक प्राथमिक उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची तातडीच्या वैद्यकीय व्यवस्थेसाठी समन्वय ठेवावा.

कार्यक्रमाच्या कालावधीत सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी ६ वाजेपासून कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सहभागी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत जलसंधारणाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

‘असा असेल महा-वॉकेथॉन’ मार्ग

‘महा-वॉकेथॉन’ पोलिस मुख्यालय मैदान येथून सुरु होणार असून पुढीलप्रमाणे मार्ग राहील. शिवाजीनगर पुणे → संचेती हॉस्पिटल चौक → जंगली महाराज रस्ता → झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक → घोले रस्ता → फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता →पोलिस मुख्यालय मैदान,शिवाजीनगर पुणे.

सहभागासाठी नोंदणीसाठी

https://register.mahaevent.co.in/#/register या संकेतस्थळावर नोंदणी करावी. माती आणि पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून ती आपल्या पुढील पिढीचे भविष्य आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×