Breking News
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठारजेष्ठाच्या मोबाइलचा ताबा घेउन ४ लाखांचा गंडाइमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून दोघे कामगार ठारजलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन-रन फॉर वॉटर ’साठी प्रशासन सज्जपुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६७ लाखांची फसवणूक‘धर्मस्वातंत्र्य’ कायदा लागू होण्यापूर्वी पुणे पोलिसांकडून कारवाईची घाई ?दुबईहून आलेला तरुण पुणे विमानतळावरुन बेपत्तानैराश्यातून बीडच्या खो-खो पटूची पुण्यात आत्महत्यापत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६७ लाखांची फसवणूक

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६७ लाखांची फसवणूक

सेवक, पर्यवेक्षक आणि हवालदार पदावर नोकरी लावण्याचे आमिष

marathinews24.com

पुणे – पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६७ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय अनंता भालेराव, शिवानंद बाळासाहेब पाटील (दोघे रा. कर्वेनगर), अमित दारवटकर, आनंद लोंढणवार, अमित सुहास देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जबरी चोऱ्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाश – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २२ वर्षीय तरुण खडकवासला परिसरातील नांदोशी गावात राहायला आहे. आरोपींनी तरुणाला दोन वर्षांपूर्वी महापालिकेत सेवक, पर्यवेक्षक, हवालदार अशा पदांवर नोकरी लावतो, असे सांगितले होते. महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तक्रारदारासह अन्य तरुणांकडून त्यांनी गेल्या दोन वर्षांत ६७ लाख रुपये घेतले होते. पैसे घेतल्यानंतर त्यांनी नोकरी लावली नाही. नोकरी न लावल्याने तरुणाने त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ सुरू केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारासह अन्य तरुणांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक साळुंके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×