Breking News
ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालन

ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीला

ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून चोरट्यांनी एक लाख १८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना धनकवडीत घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७७ वर्षीय ज्येष्ठ महिला धनकवडीतील ट्रायडंट सोसायटीत राहायला आहेत. त्यांच्या सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी चोरट्यांनी साधली. शयनगृहातील टेबलवर ठेवलेल्या पिशवीतून चोरट्यांनी एक लाख १८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी करणारे चोरटे माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत संघर्षी तपास करत आहेत.

हडपसरमध्ये घरफोडी

हडपसरमधील सातववाडी भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा एक लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सातववाडीतील श्रमिक काॅलनीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, तसेच स्वयंपाकघरातील एका बरणीत ठेवलेली दोन हजार रुपयांची रोकड चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र सलगर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×