वडकीतील घटना; चौघांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – शेतजमिनीतील रस्त्याच्या वादातून भावंडांवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना दिवे घाट पायथ्याशी असलेल्या वडकी भागात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात महेश हनुमंत गायकवाड आणि त्यांचा भाऊ महेंद्र (दाेघे रा. तळेवाडी, वडकी, सासवड रस्ता) जखमी झाले आहेत. याबाबत त्यांचे वडील हनुमंत वामन गायकवाड (वय ६३) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी नितीन मुरलीधर फाटे, अक्षय दादा फाटे, अंकुश राजाराम फाटे, अमोल सुंदर फाटे (चौघे रा. तळेवाडी, वडकी, सासवड रस्ता) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या; पतीला अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मस्तानी तलावाजवळ तळेवाडी गाव आहे. गावात गायकवाड आणि आरोपींची शेतजमीन आहे. ११ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास हनुमंत गायकवाड यांची मुले महेश आणि महेंद्र हे शेतात काम करण्यासाठी निघाले होते. त्या वेळी आरोपींनी त्यांना अडवले. ‘शेताकडे जाणारा रस्ता वापरायचा नाही. रस्ता वापरला तर जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी आरोपींनी दाेघांना दिली. त्यानंतर आरोपींनी दोघांवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यात महेश आणि महेंद्र जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस फौजदार फडतरे तपास करत आहेत.






















