Breking News
चौफुला-सुपे रस्त्यावर एसटी बसचा अपघातससून रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूकपाण्याची धोकादायक टाकी पडताना कामगार जखमीभारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पाण्याची धोकादायक टाकी पडताना कामगार जखमी

अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे कामगार बचावला

marathinews24.com

पुणे – शहरातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील धोकादायक स्थितीत असलेली ५० फूट उंच टाकी पाडताना एक कामगार जखमी झाला. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला कामगार अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे बचावला. बुधवारी पहाटे ही घटना घडली.बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात ५० फूट उंच टाकी आहे. हे टाकी धोकादायक झाली असून, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ही टाकी पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. टाकी पाडताना दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने तेथे अग्निशामक दलाचे अधिकारी आणि जवान तैनात करण्यात आले होते.

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान – सविस्तर बातमी

बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास टाकी पाडण्याचे काम सुरू असताना काही भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली एक कामगार अडकला. या घटनेत कामगार गंभीर जखमी झाला. अ्ग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जवानांनी कामगाराला धीर देऊन त्याच्याशी संवाद साधला. बोल्डर कटर, स्प्रेडर, टिकाव, फावडे, दोरी असे साहित्य वापरुन तासाभरात जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला बाहेर काढले. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन दलाचे अधिकारी नीलेश महाजन, जवान राजू ओव्हाळ, अमित कसबे, भाऊसाहेब चोरमले, विजंय पिंजण, जयेश गाताडे, अल्पेश कोंडे, नवनाथ जेडगे, मारुती देवकुळे, विशाल गायकवाड, आतिश ओव्हाळ, प्रताप सांगळे, सुरेश पवार, प्रतीक कुंभार, विजय वाघमारे, मयूर चव्हाण, दत्ता खांडरे यांनी ही कामगिरी केली. जवानांनी तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला बाहेर काढल्याने अग्निशामक दलाच्या जवानांचे कौतूक करण्यात आले, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी नीलेश महाजन यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×