आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी तरुणाच्या खिशातील ८३ हजार रूपयांचा मोबाइल चोरुन नेला आहे. ही घटना १५ सप्टेंबरला सकाळी साडेसातच्या सुमारास कात्रज ते नवले पुल प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी आंबेगाव परिसरात राहणार्या १८ वर्षीय तरुणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
चौफुला-सुपे रस्त्यावर एसटी बसचा अपघात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आंबेगावमध्ये राहायला असून, १५ सप्टेंबरला सकाळी साडेसातच्या सुमारास कात्रजबस स्थानक ते नवले पुल असा पीएमपीएल प्रवास करीत होता. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्याने तरुणाच्या खिशातील ८३ हजार रुपयांचा मोबाइल चोरुन नेला. काही वेळानंतर तरुणाला मोबाइल खिशात नसल्याचे जाणावल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अमलदार अजय कामठे तपास करीत आहेत.
लोणीकंदमध्ये चिकन सेंटरची तोडफोड, लुटमार
टोळक्याविरुद्ध गुन्हा
चिकन सेंटरमध्ये कामाला असलेल्या तरूणाला हाताने, काठीने मारहाण करीत गल्ल्यातील ३१ हजार रूपये चोरुन नेले. ही घटना १४ सप्टेंबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लोणीकंदमधील रामनगरात असलेल्या अभिषेक चिकन सेंटरमध्ये घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोणीकंद मधील रामनगरात राहायला असून, त्यांचे अभिषेक चिकन सेंटर आहे. १४ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास टोळक्याने दुकानात येउन कामगार शाम उल्ला शेख याला मारहाण केली. अंड्याचे ट्रे फोडुन दुकानाची तोडफोड केली. गल्ल्यातील ३१ हजारांची रोकड चोरुन नेली. याप्रकरणाची माहिती होताच मालकाने लोणीकंद ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गजानन कागणे तपास करीत आहेत.





















