Breking News
चौफुला-सुपे रस्त्यावर एसटी बसचा अपघातससून रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूकपाण्याची धोकादायक टाकी पडताना कामगार जखमीभारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

दिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटना

दिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटना

देवघराशेजारील टेबल-पाट जळाले, अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणली

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाच्या काळात देशपातळीवर व राज्यात उत्साह आणि भक्तिमय वातावरण असते. बाप्पाच्या आगमनानंतर घर व अनेक मंडळे दहा दिवस बाप्पांची सेवा करीत असतात. यावेळी घरात अथवा मंदिरात दिवा, उदबत्ती, विद्युत रोषणाई आणि मोठ्या प्रमाणात सजावट केलेली असते. हा उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी अग्निशमन विभाग सतर्क राहून आपले कर्तव्य चोख बजावत असताना नागरिकांनी देखील खबरदारी घेणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा – सविस्तर बातमी 

आज सायंकाळी सहाच्या सुमारास वानवडी येथील एका इमारतीत सातव्या मजल्यावर आग लागल्याची वर्दि मिळताच कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. जवानांनी धाव घेत पाहणी केली असता घरातील देवघराशेजारी असलेले टेबल व त्यावरील पाटाने पेट घेतला होता. कुटूंबातील सर्व सदस्य श्रींच्या दिड दिवसाचे विसर्जनाकरिता गेले असता हि घटना घडली. देवघराला ही याची झळ बसली असून जवानांनी लगेचच आगीवर पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली व धोका दूर केला. या घटनेत जखमी कोणी नसून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे व वाहन चालक दिपक कचरे आणि फायरमन मोहन सणस, सागर नेवगे, पृथ्वीराज खेडेकर, शिवकुमार दिक्षित यांनी सहभाग घेतला.

“गणेशोत्सवाच्या काळात दलाचे जवान सज्ज असून भाविकांनी मंडप व घरामध्ये पेटता दिवा त्याची वात तसेच उदबत्ती याची विशेष खबरदारी घेत विद्युत यंञणा ही सुस्थितीत राहिल हे पाहावे. आग वा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधावा.”

गणेश सोनुने, मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभाग, पुणे मनपा

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×