Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

भीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

भीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

गावांचे नियोजनबद्ध पुनर्वसन; मूलभूत सुविधांसह आदर्श गाव उभारणार

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. मंदिर परिसराचा विकास करताना स्थानिक ग्रामस्थांचे नियोजनबद्ध पुनर्वसन, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि पर्यावरणाचे संवर्धन यांचा समन्वय साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात भीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याबाबत आज आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार बाबाजी काळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश इंदलकर उपस्थित होते.

पशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात ; शेतकरी-पशुपालकांनी लाभ घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन – सविस्तर बातमी 

विकास आराखड्यांतर्गत ग्रामस्थांना त्यांच्या विद्यमान जमिनीच्या क्षेत्रफळानुसार भूखंड देण्यात येणार असून, त्यासोबत १ बीएचके, २ बीएचके आणि ३ बीएचके स्वरूपातील सुसज्ज घरे बांधून देण्यात येणार आहेत. नवीन गावात ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, शाळा, बहुउद्देशीय सभागृह, समाजमंदिर, अन्नछत्र, पार्किंग, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा, पथदिवे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

मंदिर परिसरातून गावाला जोडणारा कॉरिडॉर विकसित करण्यात येणार असून, भाविकांसाठी प्रसादगृह, होल्डिंग एरिया, बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. दर्शनानंतर भाविक पायरी मार्गाने गावात येऊ शकतील. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या व्यवसायाला चालना मिळेल. नदी व कुंड परिसराची स्वच्छता, फेन्सिंग, भाविकांसाठी सुरक्षित तीर्थस्नानाची व्यवस्था करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. विकास कामादरम्यान ग्रामस्थांच्या सूचना व सहकार्य घेऊन कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

पावसाळ्यानंतर ऑक्टोबरपासून कामांना गती देऊन जून २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विकास कामानंतर परिसरात अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम होऊ नये, यासाठी स्थानिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले. यावेळी भीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याबाबत चित्रफित दाखविण्यात आली. गाव व परिसर कामाअंती कसा असेल, याबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीस भीमाशंकर येथील विश्वस्त, ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×