भांडी चोरणारे अटकेत
marathinews24.com
पुणे : मंडप साहित्य केंद्रातून दोन लाख रुपयांची भांडी चोरणाऱ्या चोरट्यांना खडकी पोलिसांनी अटक केली. सौरभ संजय पळसे (वय २३, सध्या रा. धनकवडी, मूळ रा. कोल्हापूर), सोमनाथ मारुती बर्गे (वय ३६, रा. सातारा), प्रसाद राजेंद्र भरेकर (वय ३६, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत मंडप साहित्य केंद्राच्या मालकांनी खडकी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अनैतिक संबंधांना विरोध केल्याने बेदम मारहाण तरुणाचा खून – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे खडकी बाजार परिसरात प्रतीक मंडप केंद्र आणि डेकोरेटर्स व्यवसाय आहे. मंडप साहित्याच्या दुकानाच्या परिसरात ठेवलेली भांडी चोरटे पळसे, बर्गे, भरेकर यांनी २४ एप्रिल रोजी चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करुन आरोपींना पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिग्विजय चौगले आणि पथकाने ही कामगिरी केली.