Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

अनैतिक संबंधांना विरोध केल्याने बेदम मारहाण; तरुणाचा खून

Pune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्न

कात्रज भागातील घटना

marathinews24.com

पुणे – अनैतिक संबंधांना विरोध केल्याने जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज भागातील गुजरवाडी परिसरात शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पसार झालेल्या दोघांना अटक केली.

सायबर चोरट्यांकडून महिलेची १४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, गुजरवाडी रस्ता, मांगडेवाडी, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय ३२), केशव मोतीराम असोरे (वय २६, दोघे रा. खोपडेनगर, गुजरवाडी, कात्रज) यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या नात्यातील एका महिलेचे आरोपी रोहित याच्याशी अनैतिक संबंध होते. रोहित हा रिक्षा चालवायचा. त्यानंतर त्याने प्रवासी वाहने भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला. मनोहर यांनी अनैतिक संबंधांना विरोध केला होता. या कारणावरुन त्यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. शुक्रवारी रात्री रोहित आणि त्याच्याबरोबर असलेले दोन ते तीन साथीदार कात्रज भागातील पवारनगर भागात आले. रोहित, केशव आणि साथीदारांनी शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यात बांबू घातला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शिंदे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेला आरोपी रोहित याला ताब्यात घेण्यात आले. त्याचा साथीदार केशव याला बीडमधील गेवराई परिसरातून ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×