Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

बिबवेवाडीत पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

बिबवेवाडीत पर्यावरण रक्षणासाठी प्रशासनाची कठोर भूमिका; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

marathinews24.com

पुणे– शहरातील सर्वे क्रमांक ५७९/१ब, मौजे बिबवेवाडी येथे पर्यावरणाचा ऱ्हास करुन अनधिकृतपणे डोंगरफोड करणाऱ्या विरुद्ध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. यापुढे अनधिकृतपणे उत्खनन करुन पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल – सविस्तर बातमी 

बिबवेवाडीत अनधिकृतपणे डोंगरफोड करुन जागेचे सपाटीकरण करण्याचे काम सुरु असल्याबाबतची माहिती प्रशासनाला मिळाली; या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने ड्रोनद्वारे स्थळ पाहणी करुन पंचनामा केला. या ठिकाणी अनधिकृत उत्खनन व डोंगरफोड करुन जागा सपाटीकरण होत असल्याचे निदर्शनास आले आणि प्रशासनाच्यावतीने ते तात्काळ थांबविण्यात आले.

याकामी वापरण्यात आलेले पोकलँड हुंडाई टू टेन ताब्यात घेण्यात आले आहे. या मिळकतीचे मालक राकेश शर्मा असून त्यांनी व विकसकानी उत्खनन तसेच जागा सपाटीकरणाकरीता शासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे कार्यवाहीत निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. कारवाईत हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले,हवेली तहसीलदार किरण सूरवसे, मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी एकत्रितपणे कार्यवाही केली आहे, अशी माहिती डुडी यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×