Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

शहरातील हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सद्यस्थिती व निधीबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून आढावा

Yerawada Drainage Pit Death Case

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतला आढावा

marathinews24.com

पुणे –  पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची सद्यस्थिती व त्यासाठीच्या निधी उपलब्धतेबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य विभागाकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिके करिता मंजुर एकूण ९१ दवाखान्यांपैकी पुणे महानगरपालिके अंतर्गत ०८ व पिंपरी चिंचवडमधील ०७ दवाखाने सुरू झाले असून उर्वरीत आपला दवाखाने तातडीने सुरु करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन – सविस्तर बातमी 

यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. स्वनील नाळे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, महानगरपालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक, सहायक संचालक डॉ. दिप्ती देशमुख, विशेष कार्य अधिकारी प्रशांत पिसाळ आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यातील विविध शहरांमध्ये गोरगरीब नागरिकांच्या सेवेसाठी हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार आपला दवाखाना सुरु करण्यासाठी ज्याठिकाणी स्वतःच्या जागा उपलब्ध आहेत तेथील भाड्यापोटी मिळणारा निधी जागेची डागडुजी, नूतनीकरण, यंत्र सामुग्री खरेदी, अतिरिक्त औषधे खरेदी यासाठी वापरण्यास मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत, प्रस्तावास मान्यता मिळेपर्यंत स्वतःच्या जागेवर आपला दवाखाना सुरु करण्यात यावेत.

नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दिरंगाई होणार नाही याची काळजी घ्यावी. रुग्णांच्या सोयीसाठी जनरेटर, डास संरक्षक जाळ्या, आवश्यक उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत. झोपडपट्टी भागात पावसाळ्यात पाणी साठून रुग्णांची गैरसोय होणार नाही, अशी जागा निवडावी, अशा ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरुन बांधकाम, डागडुजी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

त्या पुढे म्हणाल्या, आरोग्य सेवा तत्परतेने देणे गरजेचे असून महानगरपालिकेने प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन सद्यस्थिती कळवावी. ज्या ठिकाणी नागरिकांचा विरोध होत असेल तेथे जनसुनावणी घेऊन जागा निश्चित करावी आणि दवाखाने कार्यान्वित करावेत.दि २५ मे पासुन शासनाचा आरोग्य विभाग, मनपा व सामाजिक संस्था यांच्या समन्वयाने आरोग्य शिबिरे या ठिकाणी घेण्याचे नियोजित असून महिलांची रक्त तपासणी,कॅल्शियम व लोह कमतरता तपासून औषध वाटप इत्यादी आरोग्य सुविधांवर भर देण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×