जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल
marathinews24.com
पुणे – बुध्द पौर्णिमेनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी (१२ मे) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अनुयायांची होणारी गर्दी विचारात घेऊन या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू – सविस्तर बातमी
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते साधू वासवानी चौकाकडे जाणारा मार्ग सोमवारी दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बाेल्हाई चौक,पुणे स्टेशन चौकातून अलंकार चित्रपटगृहमार्गे इच्छितस्थळी जावे. अग्निशमन दलाचे बंब, पोलीस, तसेच रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी मार्ग मोकळा राहणार आहे. अन्य वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.