वाघोलीत चोरट्यांनी महावितरणच्या ट्रान्सफाॅर्मरची केली चोरी
marathinews24.com
पुणे – नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील एका गृहप्रकल्पाच्या आवारातून चोरट्यांनी महावितरणचे रोहित्र (ट्रान्सफाॅर्मर) चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरलेल्या रोहित्राची किंमत तीन लाख ८० हजार रुपये असल्याचे महावितरणकडून देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. महावितरणचे सहायक अभियंता दीपक बाबर यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सायबर चोरट्यांचा पुणेकरांना दणका, ३ घटनांमध्ये ७६ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
वाघोलीतील एका गृहप्रकल्पासाठी महावितरणकडून २०२० मध्ये उच्चक्षमतेचे राेहित्र उपलब्ध बसविण्यात आले होते. तेथे असलेले जुने रोहित्र गृहप्रकल्पाच्या आवारात पडून होते. १९ एप्रिल रोजी महावितरणचे कर्मचारी निलेश तिजारी गृहप्रकल्पाच्या आवारातील विद्युत मीटरची (रिडिंग) करण्यासाठी गेले होते. त्या वेळी गृहप्रकल्पाच्या आवारातील जुने रोहित्र जागेवर नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महावितरणकडून चौकशी करण्यात आली. रोहित्र चोरून नेण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर महावितरणकडून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. भारतीय विद्युत अधिनियम २०२३ कलम १३६ (विद्युत साहित्य चोरी), तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित्र अवजड असते. चोरट्यांनी गृहप्रकल्पाच्या आवारातून रोहित्र कसे चोरुन नेले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.