Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Shirur Seva Sankalp : शिरूर नगरपरिषदेतर्फे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विविध उपक्रम

Shirur Seva Sankalp

स्वच्छता, कचरा वर्गीकरण, वृक्षारोपण आणि जलस्रोत संवर्धनावर भर

marathinews24.com

पुणे – शिरूर नगर परिषदेमार्फत ‘सेवा संकल्प अभियान’ (Shirur Seva Sankalp) अंतर्गत शहराच्या सर्वांगीण स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. शहरातील शाळा, नदीकिनारे, व्यावसायिक भाग तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात येत आहे.

विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेत नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन कागदपत्रे संकलित करणार – सविस्तर बातमी 

शहर स्वच्छ व कचरामुक्त ठेवण्याच्या उद्देशाने शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच घरोघरी कचरा वर्गीकरण, ओला-सुका कचरा व्यवस्थापन आणि घरगुती कंपोस्टिंग याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनात सहभागी व्हावे, यासाठी नगर परिषदेकडून सातत्याने प्रबोधन केले जात आहे.

पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून सोनार आळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले असून, (Shirur Seva Sankalp) शहरातील इतर भागांतही आगामी काळात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्र वाढविण्यासाठी नगर परिषदेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

यासोबतच शहरातील जलस्रोतांची स्वच्छता व संवर्धन यावरही विशेष भर देण्यात आला आहे. जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

Shirur Seva Sankalp गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर नदी, तलाव व इतर जलस्रोतांमध्ये निर्माल्य जाणार नाही, यासाठी निर्माल्य संकलनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. संकलित निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यात येणार असून, कचऱ्याचे संसाधनात रूपांतर करण्याचा हा उपक्रम पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाला चालना देणारा ठरणार आहे. तसेच या अभियानांतर्गत मालमत्ता हस्तांतरण, जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देणे, महिला बचत गट नोंदणी करणे, दिव्यांगांना यू.आय.डी. कार्ड देणे इत्यादी शिबीरे घेण्यात आली आहेत.

स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक शिरूर घडविण्यासाठी नगर परिषद प्रशासनासोबत नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे. १७ ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याचा नगर परिषदेचा संकल्प असल्याचे शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  प्रितम पाटील यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×