Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Marathi Sahitya Sammelan : गुजरातमध्ये होणार मराठीचा जागर; वडोदऱ्यात पहिले सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन

Marathi Sahitya Sammelan : गुजरातमध्ये होणार मराठीचा जागर; वडोदऱ्यात पहिले सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन

२५ ऑक्टोबरला संमेलन होणार

marathinews24.com

पुणे – कला, संस्कृती आणि मराठी साहित्याला राजाश्रय देऊन समृद्ध करणारे थोर विचारवंत महाराजा सयाजीराजे गायकवाड यांच्या ऐतिहासिक कर्मभूमीत, म्हणजेच गुजरात मधील वडोदरा येथे ‘१ ले सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन’ (Marathi Sahitya Sammelan) मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने हे संमेलन २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आले असल्याची अधिकृत माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली.

लंडनच्या मातीत कुंजीर तालमीच्या पैलवान युवराज खोपडे यांचा डंका – सविस्तर बातमी 

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे आजवरचे हे ऐतिहासिक २०० साहित्य संमेलन आहे. महाराजा सयाजीराजे गायकवाड यांनी आपल्या कारकिर्दीत शिक्षण, ग्रंथालये आणि मराठी साहित्याच्या प्रसारासाठी अभूतपूर्व योगदान दिले. त्यांनी मराठी भाषेचा आणि साहित्यिकांचा नेहमीच गौरव केला. (Marathi Sahitya Sammelan) त्यांच्या याच ऐतिहासिक योगदानाला उजाळा देण्यासाठी आणि गुजरात मधील मराठी भाषक तसेच रसिकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या विशेष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्य परिषदेच्या गुजरात प्रदेश उपाध्यक्ष रंजनादेवी भोईटे यांची तर संमेलनाच्या निमंत्रकपदी परिषदेच्या कार्यक्षम प्रदेश सरचिटणीस मानसी म्हसकर यांची निवड करण्यात आली आहे.

ऐतिहासिक वडोदरा नगरीत होणाऱ्या या १ ल्या सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात पारंपरिक ग्रंथपूजानाने व ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर भव्य उद्घाटन समारंभ, विविध वैचारिक विषयांवरील परिसंवाद आणि रसाळ कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संमेलनामुळे महाराष्ट्र आणि गुजरात मधील सांस्कृतिक व साहित्यिक नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या सोहळ्यास महाराष्ट्र आणि गुजरातमधून मोठ्या संख्येने साहित्यिक, लेखक, कवी आणि रसिक प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×