Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Dehu Cleanliness Drive : देहू नगरपंचायतीमार्फत घाट परिसर व संत तुकाराम महाराज मंदिराची स्वच्छता

Dehu Cleanliness Drive : देहू नगरपंचायतीमार्फत घाट परिसर व संत तुकाराम महाराज मंदिराची स्वच्छता

घाट, मंदिर परिसरातील कचरा व प्लास्टिक हटवून धार्मिक-पर्यटनस्थळांच्या स्वच्छतेला प्राधान्य

marathinews24.com

पुणे – Dehu Cleanliness Drive : स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग व्हावी, या उद्देशाने देहू नगरपंचायतीच्या वतीने आज घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली. नगरपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे स्वच्छता उपक्रमात सहभागी होत घाट परिसर स्वच्छ केला.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांना गती द्या :जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश – सविस्तर बातमी  

या उपक्रमांतर्गत घाट परिसरातील कचरा, प्लास्टिक तसेच इतर अनावश्यक वस्तू हटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली. यासोबतच देहू येथील संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदिराचीही स्वच्छता करण्यात आली. Dehu Cleanliness Drive मंदिर परिसर पाण्याने स्वच्छ धुवून घेण्यात आला. धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.

देहू नगरीला संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे तसेच वारकरी परंपरेमुळे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक देहू येथे येत असतात. त्यामुळे घाट, मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व सुयोग्य देखभाल करण्याला नगरपंचायतीकडून प्राधान्य देण्यात येत आहे.

स्वच्छता मोहिमेत नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीचा संदेश दिला. सार्वजनिक व धार्मिक स्थळांची स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनीही नगरपंचायतीच्या स्वच्छता उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×