६४ हजारांची रोकड चोरीला
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती सदाशिव पेठेतील मेडीकलची खिडकी तोडून गल्ल्यातील ६४ हजारांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना १२ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास भरत नाट्य मंदीराजवळील दीप कार्पोरेशन परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पैशांच्या वादातून मित्रानेच दगडाने मारून केले ठार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बिबवेवाडीत राहायला असून, सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदीराजवळ त्यांचे मेडीकल आहे. १२ मे रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या मेडीकलची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला. गल्ल्यातील ६४ हजारांची रोकड चोरून नेली. दुसर्या दिवशी मेडीकल उघडण्यासाठी गेल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. पोलीस अमलदार गोंजारी तपास करीत आहेत.