संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – वाहन पार्किंगच्या वादातून झालेल्या भांडणात एकाने तरूणाच्या कपाळावर आणि मानेवर लोखंडी हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना १३ मे रोजी रात्री दोनच्या सुमारास शिवाजीनगरमधील शिरोळे वस्तीवरील बिझनेस ७ स्कोअर बिल्डींगमध्ये घडली आहे. याप्रकरणी संबंधिताविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रस्त्याच्या मध्यभागी झोपला, अंगावरून मोटार गेल्याने जीवाला मुकला – सविस्तर बातमी
सिद्धेश पढरे (रा. बिझनेस ७ स्कोअर इमारत, शिरोळे वस्ती ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नीलेश तानाजी पवार (वय ३२ रा. चांदे-नांदे, मुळशी, पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. याप्रकरणी सुनीता सर्जेराव पढरे (वय ४२) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पढरे कुटूंबिय आणि आरोपी नीलेश पवार शिवाजीनगरमधील शिरोळे वस्ती परिसरातील एकाच इमारतीत राहायला आहेत. १३ मे रोजी सिद्धेश हा गाडी घेउन इमारतीत आला होता. त्यावेळी गाडी पार्क करण्याच्या वादातून त्याचे नीलेशसोबत भांडण झाले. त्याच रागातून नीलेशने लोखंडी हत्याराने सिद्धेशच्या डोक्यात, कपाळावर मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील तपास करीत आहेत.