Breking News
अमली पदार्थांविरोधातील लढ्यात युवकांनी पुढे यावे- पोलिस आयुक्त अमितेश कुमारराज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारबांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्यामतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वितपुण्यात ठेकेदाराकडे मागितली ३७ लाखांची खंडणीकौशल्य प्रशिक्षणामुळे युवक आत्मनिर्भर बनतील – डॉ. बबन जोगदंडगणना अर्जांच्या डिजिटायझेशनमध्ये राजकीय पक्षांनी सक्रिय भूमिका घ्यावीपुण्यात मिशन क्रॅकडाउनचा गुंडांना तडाखा बसणारह.भ.प. उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते लोणी देवकर एमआयडीसी येथे वृक्षारोपणजगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानंतर बारामतीत स्वच्छता मोहीम

फिरण्यासाठी रिक्षासह दुचाकी चोरणार्‍यांना अटक

दोन रिक्षासह दुचाकी जप्त, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – फिरण्यासाठी रिक्षासह दुचाकी चोरणार्‍या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ रिक्षा, दुचाकी अशी वाहने जप्त केली आहेत. चेतन राजु जाधव ( वय २५ रा राजगड व्हिलाजवळ, आंबेगाव पठार) गणेश दत्तात्रय जगदाळे (वय २६ रा. धनकवडी, आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी आणखी कोठे गुन्हे केले आहेत का, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहेत.दरम्यान, वाहनचोरी रोखण्यासाठी हद्दीत पेट्रोलिंग वाढविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी दिली आहे.

नागरी संरक्षण दलातर्फे येरवडा येथील सह्याद्री रुग्णालयात अग्निशमन प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिके संपन्न – सविस्तर बातमी

वाहनचोरी रोखण्याच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, किरण साबळे हे वाहन चोरांचा शोध घेत होते. त्यावेळी आरोपी चेतन राजु जाधव व गणेश दत्तात्रय जगदाळे यांनी वाहन चोरी केली असून, ते आंबेगाव पठार परिसरात थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेउ आरोपींना ताब्यात घेतले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, किरण साबळे, सचिन सरपाले, मंगेश पवार, महेश बारवकर, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×