अल्पवयीन मुलांच्या टाेळीने ५ वाहनाची केली तोडफोड

रामटेकडी परिसरात वाहनांची ताेडफाेड

पुणे – बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्यावरील ५ वाहनांची ताेडफाेड करत अल्पवयीन टोळक्याने रामटेकडी परिसरात दहशत निर्माण केली. इथले भाई असल्याचे म्हणत आमच्या नादाला काेणी लागायचे नाही, काेणी समाेर आला तर त्याला संपवून टाकु अशी धमकी देत अल्पवयीन टाेळक्याने दहशत पसरवण्याचा प्रकार वानवडी परिसरातील रामटेकडी परिसरात घडला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी ६ मुलांविराेधात गुन्हा दाखल केला.

कुख्यात गजा मारणेच्या साथीदाराला सांगलीतून बेड्या, पुणे गुन्हे शाखेची कारवाई – सविस्तर बातमी 

ऋषिकेश देडे (वय-१९, रा. हडपसर, पुणे) आराेपीला अटक केली आहे. तर १७ वर्षाचे तीन मुले, १६ वर्षाचा मुलगा, १३ वर्षाच्या मुलाविराेधात भान्यास १८९ (२),१९०, ११९ (१), ११९ (२), ११९ (३), ३५२, ३२४ (४) (५), क्रिमिनल लाॅ अमेंडमेंट ७ , मपाेअधि ३७ (१), (३), १३५ नुसार गुन्हा दाखल केला. याबाबत राकेश श्रीनिवास साळवी (वय- ३८, रा. हडपसर,पुणे) यांनी आराेपी विराेधात फिर्याद दिली. हडपसर परिसरातील रामटेकडी भागात स्वामी विवेकानंद नगरमध्ये मुलांनी बेकायदेशीर टाेळके जमवले. त्यानंतर रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या नागरिकांचे ५ वाहनांवर दगड मारुन काचा फाेडून नुकसान केले. याप्रकारामुळे नागरिक भयभीत झाल्यावर त्यांनी संबंधित भागात दगडफेक केली. आम्ही इथले भाई आहाेत, नादाला काेणी लागायचे नाही, काेणी समाेर आला तर त्याला संपवून टाकु अशी धमकी देऊन दहशत पसरवली आहे. पाेलीस उपनिरीक्षक एस भाेसले तपास करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×