Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त;

बँकॉकहून आलेले दोघे ताब्यात

marathinews24.com

पुणे – महसूल गुप्तचर विभागाकडून (डिरेक्टोरेट रेव्हेन्यू इंटलिजन्स) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दहा कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला .याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार ‘डीआरआय’च्या पथकाकडून मुंबईतून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पुण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली भलतेच उदयोग; बाणेर पोलिसांकडून दोन मसाज पार्लरवर छापा – सविस्तर बातमी 

बँकाॅकहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी (१२ मे) दोघे जण विमानतळावर उतरले. त्यांच्याकडे हायड्रोपोनिक गांजा असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या मुंबई पथकाला मिळाली. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर दोघांची चौकशी केली. त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा प्लास्टिकच्या पिशवीत हायड्रोपोनिक गांजा सापडला. चौकशीत मुंबईतील एकाकडे हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती दोघांनी दिली. ‘डीआरआय’च्या पथकाने मुंबईतून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून त्यांचे अभिनंदन गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत दहा किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. असून, आंतराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत १० कोटी रुपये असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून, यापूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन केंद्रीय सीमाशुल्क (कस्ट), तसेच डीआरआयच्या पथकाने तस्करी करुन आणलेले अमली पदार्थ, तसेच सोने जप्त केले आहे. हायड्रोपोनिक गांजा रासायनिक प्रक्रिया करून तयार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत जास्त आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×