ताडीवाला रस्ता परिसरात घडला अपघात
marathinews24.com
पुणे – रस्त्याच्या मध्यभागी झोपणे तरूणाच्या जीवावर बेतले असून, अंगावरून मोटार गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १२ मे रोजी ताडीवाला रस्ता परिसरातील सौरभ हॉलसमोर घडला आहे. याप्रकरणी अज्ञात मोटार चालकाविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सरोज सुदर्शन बिश्वाल (वय ४५, रा. वडगाव शेरी मूळ-ओरिसा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पीएमपीएल बसप्रवासात चोरीचे सत्र कायम – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोज बिश्वाल मूळचा ओरिसातील असून, तो १२ मे रोजी ताडीवाला रस्ता परिसरातील सौरभ हॉलसमोर रस्त्याच्या मधोमध झोपला होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या मोटार चालकाने त्याच्या अंगावर मोटार चढविली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या सरोजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी मोटार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर याप्रकरणाचा तपास करीत आहेत.




















