Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पीएमपीएल बसप्रवासात चोरीचे सत्र कायम

जेष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठ महिलांचे दागिने चोरण्याचे सत्र कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. स्वारगेट ते औंधगाव असा बसप्रवास करणार्‍या जेष्ठ महिलेला लक्ष्य करीत त्यांच्या हातातील ९२ हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली. ही घटना १२ मे रोजी संध्याकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास प्रवासात घडली आहे. याप्रकरणी कल्पना बाळू पवार (वय ६० रा. जुनी सांगवी, पुणे) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात सायबर चोरट्यांचा तरूणांना तडाखा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना पवार कुटूंबियासह जुनी सांगवी परिसरात राहायला असून, कामानिमित्त १२ मे रोजी स्वारगेटला आल्या होत्या. काम झाल्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी कल्पना बसने प्रवास करीत होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी कल्पनाच्या हातातील ९२ हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली. बसमधून उतरताना त्यांना हातात सोन्याची बांगडी नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार शिर्के तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×