लघुशंकेचा केला बहाणा, आडबाजूला नेली रिक्षा
marathinews24.com
पुणे– लघुशंकेचा बहाणा करीत रिक्षाचालकाने साथीदाराच्या मदतीने तरूण प्रवाशाला लुटल्याची घटना १२ मे रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वारजेतील म्हाडा वसाहतीजवळील डोंगराळ भागात घडली आहे. दोघाजणांनी तरूणाला धमकावून त्याचा मोबाइल, दोन हजारांचा रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी राहूल गोविंद भोई (वय ३३ रा. बावधन ) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पार्किंगच्या वादातून तरूणावर वार, पुण्यातील शिवाजीनगरमधील घटना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल भोई हे १२ मे रोजी कामावरून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वारजे ब्रीज परिसरात थांबले होते. त्यावेळी बावधनकडे जाणार्या रिक्षाला हात दाखवून त्यांनी प्रवास सुरू केला. त्यावेळी रिक्षात आणखी एकजण प्रवास करीत होता. चालकाने काही अंतरावर गेल्यानंतर लघुशंका आल्याचा बहाणा करीत रिक्षा डोंगराळ भागात नेली. त्याठिकाणी गाडीतील आधीच बसलेला चालकाचा साथीदारासह रिक्षाचालकाने भोई यांना दमदाटी केली. त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करून खिशातील मोबाइल, दोन हजारांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपींनी राहूला सोडून दिले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते तपास करीत आहेत.
उपनगरात रिक्षाचालकांकडून लुटमारीचे अनेक प्रकार
शहरातील विविध भागात उपनगरात वाहतूक करणार्या रिक्षा चालकांनी प्रवाशांना धमकावून लुटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने घरी जाण्यासाठी वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांना गाडीत बसवून डोंगराळ भागात नेले जाते. त्याठिकाणी त्यांना धमकावून जबरदस्तीने लुटले जाते. अशीच घटना महिला प्रवाशांनीही अनुभवली आहे. कामासाठी जात असताना रिक्षा चालकाने त्यांना बसवून डोंगराळ भागात नेले होते. त्याठिकाणी त्यांना धमकावून लुटमार केली होती.