हाणामारी प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – सोसायटीत क्रिकेट खेळण्यावरुन झालेल्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाल्याची घटना पाषाण भागात घडली. हाणामारी प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षा चालकाने साथीदाराच्या मदतीने प्रवाशाला लुटले – सविस्तर बातमी
पाषाण-सूस रस्त्यावरील पूर्वा हाईट्स सोसायटीत रविवारी सकाळी दहाच्या सुमारास शाळकरी मुले क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळताना मुलांमध्ये वाद झाला. वादावादीचा प्रकार मुलांच्या पालकांना समजला. त्यानंतर मुलांचे पालक सोसायटीच्या आवारात आले. त्यांच्यात वाद सुरू झाले. वादावादीचे पर्यवसन हाणामारीत झाले. एकाला बॅटने मारहाण करण्यात आली. मारहाणीत तो जखमी झाला. मारहाण, तसेच शिवीगाळ प्रकरणी दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या. त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके तपास करत आहेत.