चोरट्यांविरुद्ध लष्कर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Pune House Robbery News : लष्करी अधिकारी वसाहतीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा २० लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना लष्कर भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत एकाने फिर्याद दिली आहे.
पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४२ वर्षीय लष्करी अधिकारी हे गुरुद्वारा रस्त्यावरील ऑफिसर काॅलनी वसाहतीत राहायला आहेत. दिवाळीनिमित्त ते कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोकड असा २० लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. १३ नोव्हेंबर रोजी ते बाहेरगावाहून परतले. (Pune House Robbery News) तेव्हा सदनिकेतून ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी वसाहतीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेटे तपास करत आहेत.
फ्लॅटमधून ६ लाखांचा ऐवज लंपास
कर्वेनगर भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका डाॅक्टर महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार डाॅक्टर महिला कर्वेनगरमधील सहवास सोसायटीत राहायला आहेत. १३ नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.






















