Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविले

Kasba Peth Crime News

अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील ८० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना कर्वे रस्त्यावर घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७३ वर्षीय महिला एरंडवणे भागात राहायला आहेत. त्या १२ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालय परिसरातील थांब्यावर थांबल्या होत्या. कोथरूड ते कात्रज या मार्गावरील पीएमपी बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी त्यांच्या हातातील ८० हजारांची सोन्याची बांगडी चोरली. चोरट्यांनी कटरचा वापर करुन बांगडी तोडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

ज्येष्ठाचा मोबाइल हिसकावण्याच्या प्रयत्न

टिळक रस्त्यावर पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्याने हिसकाविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ओंकार विजय गायकवाड (वय १९, रा. कासेवाडी, भवानी पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे नाना पेठेत राहायला आहेत. ते शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास टिळक रस्त्यावरुन निघाले होते. मराठा चेंबर इमारतीसमोर दुचाकीस्वार चोरटा गायकवाडने त्यांच्या हातातील मोबाइल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नागरिकाने आरडा ओरडा केला. दुचाकीस्वार गायकवाड तेथून पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पादचारी नागरिकांचे मोबाइल हिसकाविण्याच्या घटना वाढल्या आहेत. कसबा पेठ, बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिराजवळ, तसेच गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात मोबाइइल हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×