Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

MSEDCL Pune Chief Engineer : महावितरण पुणे परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी पंकज तगलपल्लेवार रुजू

MSEDCL Pune Chief Engineer

ज्ञानदेव पडळकर यांच्याकडून स्वीकारली पदाची सूत्रे; रास्तापेठ मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी अशोक जाधव यांची नियुक्ती

marathinews24.com

पुणे – MSEDCL Pune Chief Engineer : महावितरणच्या पुणे परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी पंकज सुभाष तगलपल्लेवार गुरुवारी (दि. १२) रुजू झाले. त्यांनी प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. पुणे परिमंडलाचे तत्कालीन मुख्य अभियंता सुनील काकडे यांची कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यामुळे रास्तापेठ शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्याकडे मुख्य अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. दरम्यान, पडळकर यांना मुख्य अभियंतापदी पदोन्नती मिळाल्याने ते गुरुवारी सायंकाळी कार्यमुक्त झाले.

श्रीमंत दगडूशेठ बाप्पाला ११०० नारळांचा महानैवेद्य – सविस्तर बातमी 

तगलपल्लेवार हे यापूर्वी महावितरणच्या मुंबई येथील मुख्यालयात विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. तेथून प्रशासकीय बदलीने त्यांची पुणे परिमंडलात नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी पुण्यातील गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरातील वीज वितरण व्यवस्थेची त्यांना चांगली जाण आहे. याशिवाय त्यांनी महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम केले आहे.

रास्तापेठ शहर मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी अशोक जाधव

ज्ञानदेव पडळकर यांना पदोन्नती मिळाल्याने रिक्त झालेल्या रास्तापेठ शहर मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी अशोक जाधव यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. त्यांनी गुरुवारी दुपारी पडळकर यांच्याकडून पदभार स्वीकारला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×