Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Shivaji University Vice Chancellor Interview : ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांची विशेष मुलाखत

Shivaji University Vice Chancellor Interview

१८ ते २० नोव्हेंबरदरम्यान आकाशवाणीवर प्रसारण; नवीन शैक्षणिक धोरण, संशोधन आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांवर होणार चर्चा

marathinews24.com

मुंबई – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. (Shivaji University Vice Chancellor Interview) विद्यापीठाने गेल्या ६४ वर्षांच्या वाटचालीत दर्जेदार शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थीभिमुख शिक्षणपद्धती, ‘कमवा आणि शिका’ योजना, विद्यार्थ्यांसाठी विविध सवलती, नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी तसेच रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त एकंदरीत कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणाऱ्या विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे.

सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरे – सविस्तर बातमी 

‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार १८, गुरुवार १९ व शुक्रवार २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी घेतली आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीसह संशोधन क्षेत्रातील योगदान, (Shivaji University Vice Chancellor Interview) नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, फिल्म मेकिंग, मोबाईल जर्नालिझम यासारखे कौशल्याधारित अभ्यासक्रम, इनोव्हेशन आणि स्टार्टअप उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रोत्साहन व मार्गदर्शन याविषयी कुलगुरु डॉ. कामत माहिती देणार आहेत. तसेच विद्यापीठातील विविध विभाग आणि अध्यासनांचे कार्य, महात्मा गांधी अध्यासन, पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन, संत तुकाराम अध्यासन यांच्या माध्यमातून सुरु असलेले अध्यापन, संशोधन व समाजोपयोगी उपक्रम, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर याबाबत कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×