Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Kothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळ

Kothrud Newborn Babies Celebration

चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून सखी-सुखदा फाउंडेशनचा उपक्रम; वस्ती भागातील १ हजारांहून अधिक मातांची सुरक्षित प्रसूती

marathinews24.com

पुणे – Kothrud Newborn Babies Celebration : आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि भावनिक क्षण असतो. मात्र, आर्थिक परिस्थिती आणि आरोग्यविषयक अडचणींमुळे अनेक महिलांसाठी हा प्रवास चिंतेचा आणि संघर्षाचा ठरतो. अशा महिलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करत, त्यांच्या मातृत्वाच्या प्रवासाला सुरक्षिततेची साथ देण्याचे मोलाचे काम कोथरुडमध्ये सुरू आहे.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणासाठी डॉ. थोरात दांपत्य देवदूतासारखे धावले – सविस्तर बातमी 

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सखी–सुखदा फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरुडमधील वस्ती भागातील गरोदर मातांना सुरक्षित प्रसूतीसाठी मदतीचा हात दिला जात आहे. या उपक्रमातून आतापर्यंत १००० हून अधिक मातांची सुखरूप प्रसूती झाली असून, अनेक कुटुंबांच्या आयुष्यात चिमुकल्यांच्या आगमनाने आनंद फुलला आहे.

जन्माला आलेल्या चिमुकल्यांसाठी बालदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व नवजात बालकांना खेळणी आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा निरागस आनंद आणि त्यांच्या मातांच्या डोळ्यांतील समाधान या सोहळ्याचे खरे वैशिष्ट्य ठरले. हा केवळ बालदिनाचा उत्सव नव्हता, तर सुरक्षित मातृत्वाच्या प्रवासातून जन्माला आलेल्या नव्या आयुष्याचा आनंद साजरा करण्याचा एक हृदयस्पर्शी क्षण होता. ज्या मातांच्या मनात कधीकाळी प्रसूतीबाबत चिंता होती, त्यांच्याच कुशीत आज निरोगी बाळांचे हास्य फुलले आहे. त्या प्रत्येक बाळाच्या आगमनामागे मायेची साथ, काळजी आणि सामाजिक बांधिलकीची भावना आहे.

सुरक्षित प्रसूतीतून एका कुटुंबाला आनंद मिळतो; पण अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे वस्ती भागातील गरोदर महिलांची सुरक्षित प्रसूती होताना, कुटुंबियांना मोठी कसरत करावी लागते. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकरातून सखी-सुखदा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमामुळे १००० हून अधिक मातांच्या आयुष्यात आनंद फुलला आहे. त्यामुळे हा उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने माणुसकीचा उत्सव आहे, अशी भावना उपक्रमाच्या संचालिका स्मिता पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमावेळी चिमुकल्यांच्या हास्यातून आणि मातांच्या चेहऱ्यावरील समाधानातून या उपक्रमाचे यश अधोरेखित झाले. प्रत्येक बाळाला सुरक्षित जन्माचा हक्क आणि प्रत्येक आईला सुरक्षित मातृत्वाचा आधार मिळावा, या भावनेतून राबवला जाणारा हा उपक्रम समाजापुढे माणुसकीचा आणि संवेदनशीलतेचा सुंदर आदर्श निर्माण करत आहे. बाल दिनाच्या कार्यक्रमासाठी सुरेखा जगताप, डॉ. मुग्धा धायगुडे, धनश्री चितळे, अस्मिता शिंदे, वृषाली मोरे, वैष्णवी केंडे, पौर्णिमा सोनार यांनी विशेष मेहनत घेतली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×