खडक पोलिसांनी जप्त केला २६ लाखांचा मुद्देमाल
marathinews24.com
पुणे – Pune Khadak Police Theft Case : चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना खडक पोलिसांनी तब्बल २५ दिवस अहोरात्र मेहनत घेत १० हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास केला. उत्तर प्रदेशातून २६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये १६ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ७ लाखांची रोकड आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. खडक पोलिसांच्या कारवाईमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
सराईत गणेश लोंढेवर एमपीडीएचा बडगा – सविस्तर बातमी
फिर्यादी जितेंद्र ऋषिकेश सिंह यांचा कामगार विशाल सत्यपाल चौहान (वय २०, रा. अवागढ, जिल्हा एटा, उत्तर प्रदेश) याच्याकडे २८ लाख रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने असलेली बॅग मुंबईतील कार्यालयात जमा करण्यासाठी दिली होती. मात्र, त्याने वाटेतच बॅग घेऊन पलायन केले. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आरोपीचा शोध घेताना तो गावातील नातेवाइकांच्या घरी लपून बसल्याने पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या. तपासादरम्यान त्याचा भाऊ बिनेश चौहान, मित्र विकासकुमार जाधोन, राधेश्याम ऊर्फ पिकू चौहान आणि ब्रिजेश चौहान यांनी कट रचल्याचे निष्पन्न झाले.
खडक पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एटा, कासगंज आणि गौतमबुद्धनगर जिल्ह्यात तांत्रिक विश्लेषनाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. कारवाईत विकासकुमार जाधोन याच्या घरातून १२० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बिस्किटांसह १६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ब्रिजेश चौहान याच्याकडून ७ लाख रुपये रोख, सोन्याची अंगठी आणि चांदीची चैन हस्तगत केली. अशा प्रकारे २६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Pune Khadak Police Theft Caseही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जहाड, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, उपनिरीक्षक राहुल मखरे, अंमलदार विनोद शिंदे, मयूर भोसले, हेमंत पेरणे, अमित जमदाडे, निलेश साबळे, विकास पांडुळे, सैफ नदाफ, उमेश मठपती, संतोष साबळे, सागर कुडले यांनी केली




















