अल्पवयीन साथीदार ताब्यात
marathinews24.com
पुणे – Pune Police Crime News : भारत संचार निगम महामंडळाची (बीएसएनल) केबल चोरणाऱ्या एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आजेश सुभाष शिंदे (वय २७, रा. शेखलाल बाजार, हिंगोली) याला अटक करण्यात आले. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत बीएसएनएलमधील कर्मचारी प्रदीप जयसिंग चव्हाण (वय ४२) यांनी सहकारनगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवाजीनगर भागात घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीजवळ बीएसएनएलकडून भूमिगत इंटरनेट केबल टाकण्याचे काम सुरू आहे. रविवारी (१५ नोव्हेंबर) पहाटे साडेचारच्या सुमारास आरोपी शिंदे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांनी ७६ हजार ८०० रुपयांची केबल चोरली. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी तिघांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. पोलिसांनी शिंदेसह साथीदारांना ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक खंडागळे तपास करत आहेत.
सफरचंदाची पेटी चोरणारा अटकेत
Pune Police Crime News : मार्केट यार्डातील फळबाजारात असलेल्या गाळ्यावरुन सफरचंदाची पेटी चोरणाऱ्याला एका पोलिसांनी अटक केली. अनिल गायकवाड (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत फळ व्यापारी शहाबुद्दीन दादालाल बांगी (वय ४८) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगी यांचा मार्केट यार्डातील फळ बाजारात गाळा आहे. रविवारी (१५ नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गाळ्यात ठेवलेली चार हजार ८०० रुपयांची सफरचंदाची पेटी गायकवाड याने चोरली. गाळ्यावरील कामगारांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करत आहेत.






















