Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Job Fraud News : परदेशात नोकरीच्या आमिषाने तरुणाची ४ लाखांची फसवणूक

Pune Fraud Case News

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जपानमधील रेसकोर्समध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एका तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आरबाज माजीद खान (रा. शीतल पेट्रोल पंपाजवळ, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसटी प्रवासी महिलेचे ९ लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा घोरपडी गावातील फैलावाली चाळीत राहायला आहे. आरोपीशी त्याची ओळख झाली होती. आरोपीने तरुणाला जपानमधील रेसकोर्समध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. जपानमधील व्हिसा मिळवून देण्यासाठी त्याने पैशांची मागणी केली. तरुणाकडून आरोपीने चार लाख १५ हजार रुपये घेतले. तरुणाला त्याने बनावट व्हिसा पीडीएफ स्वरुपात पाठविला. चौकशी केल्यानंतर फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बगाडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×