Breking News
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकार

Pune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाण

Pune Public Drinking Assault Case

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Public Drinking Assault Case : सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मनाई केल्याने वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना हनुमान टेकडी आणि स्वारगेट परिसरात घडली. हनुमान टेकडी परिसरात दारू पिणाऱ्या एकाला हटकल्याने दोघांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करण्यात आल्याची घटना २२ नाेव्हेंबर रोजी घडली. याबाबत एका तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

तक्रारदार २५ वर्षीय तरुण हा पांडवनगर भागात राहायला आहे. तो आणि त्याचा मित्र २२ नोव्हेंबर रोजी हनुमान टेकडी परिसरात सकाळी फिरायला गेले होते. त्या वेळी एक जण तेथे दारू पित होता. तरुणाकडे आरोपीने काडीपेटी मागितली. तरुणाला त्याला नकार दिला. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नको. या भागात नागरिक फिरायला येतात, असे तरुणाने आरोपीला सांगितले. आरोपीने तक्रारदार तरुण आणि त्याच्या मित्राला शस्त्राचा धाक दाखविला. तरुणासह त्याच्या मित्राला काठीने मारहाण केली. दोघांवर शस्त्राने वार केले. घटनेत तक्रारदार तरुणासह त्याच्या मित्र जखम झाले. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत. Pune Public Drinking Assault Case

स्वारगेट परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या दोघांना मनाई केल्याने एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी साहिल मनाोज चव्हाण (वय २६, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) याच्यासह मनोज नावाच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे स्वारगेट भागातील पुरंदर काॅम्प्लेक्स परिसरात राहायला आहेत. २२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी रस्त्यावर दारू पित होते. तक्रारदाराने आरोपींना सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मनाई केली. या कारणावरुन आरोपींनी तक्रारदाराला मारहाण केली. त्यांना कुंडी फेकून मारली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून रोकड लंपास

पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून ४८ हजार रुपयांची रोकड चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार ज्येष्ठ महिला गोखलेनगर भागात राहायला आहेत. त्या सोमवारी (२३ नोव्हेंबर)दुपारी आळंदी ते महापालिका भवन या मार्गावरील बसमधून प्रवास करत होत्या. प्रवासात चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून रोकड चोरुन नेल्याची घटना घडली. पोलीस हवालदार फड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×