महंमदवाडीतील कृष्णानगर परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – Hadapsar Dog Death Case : काठीने मारहाण केल्याने भटक्या श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात घडली. भटक्या श्वानाला मारहाण करुन त्याच्या मृत्यूस जबाबदार असल्या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी शिवा सुभाष कोबळकर (वय ४०, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, हडपसर ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शुभम बालाजी पोटेवाड (वय २४, रा. कृष्णानगर, महंदमवाडी, हडपसर) याने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाण – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णानगर भागात २२ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास रस्त्यावर झोपलेल्या एका भटक्या श्वानाला आरोपीने काठीने मारहाण केली. मारहाणीत श्वानाचा मृत्यू झाला. आरोपीविरुद्ध प्राण्यांना क्रुरपणे वागविण्यास प्रतिबंध ११ (१), (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सुतार तपास करत आहेत.
























