चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती सदाशिव पेठेत पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ८५ हजार रुपयांची साेनसाखळी चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना लोकमान्यनगर भागात घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी लोकमान्यनगर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे.
हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला सदाशिव पेठेतील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या दररोज सकाळी लोकमान्यनगर परिसरातील जाॅगिंग पार्क परिसरात फिरायला जातात. मंगळवारी (२३ नोव्हेंबर) त्या सकाळी पावणेसातच्या सुमारास फिरायला गेल्या होत्या. लोकमान्यनगर जाॅगिंग पार्कजवळ चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेले. महिलेने आरडा ओरडा केला. चोरटा तेथून पसार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करत आहेत.
























