Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलन

मानवसेवेच्या उपक्रमात महिला आणि शिवकन्यांचा उत्स्फूर्त सहभाग

marathinews24.com

पुणे – “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” या भावनेतून सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर रविवारी दत्तवाडी, पुणे येथे उत्साहात पार पडले. या शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर हा संघ दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवत समाजहितासाठी कार्यरत असतो. सामाजिक बांधिलकी जपत मानवसेवेचा संदेश देण्यासाठी यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड – सविस्तर बातमी

यावेळी सुजय प्रतिष्ठान मैत्री रक्ताची संस्थापक अध्यक्ष सुरेशजी सकपाळ, नगरसेविका अल्पनाताई वरपे, गणेशभाऊ वरपे, आनंद रिठे, लांजा पंचायत समिती सदस्य यशवंत वाकडे, कुणबी समाजाचे वासुदेव वाघे, मुकेश पोटे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमाला प्रोत्साहन दिले. सध्या राज्यात पाण्याचा दुष्काळा सोबतच रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांनी रक्तदान करण्यास पुढे यावे असे आव्हान मैत्री रक्ताची संस्थेचे अध्यक्ष सुरेशजी सकपाळ यांनी केले.

शिबिराच्या आयोजनासाठी सह्याद्री कुणबी संघ महाराष्ट्र प्रांत कार्याध्यक्ष गणपतदादा घडशी, अध्यक्ष विलासदादा घडशी, उपाध्यक्ष दीपक फणसळकर, प्रवीण भोज, सरचिटणीस अजित शिगवण, पुणे जिल्हाध्यक्ष नितीन शिगवण, शहराध्यक्ष सतीश डाकवे, उपाध्यक्ष प्रसाद डोळे, संजय सुकम, खजिनदार अभिषेक पानकर, पांडुरंग पानकर, महिला आघाडी अध्यक्षा शीतलताई मंचेकर, कार्याध्यक्ष वैष्णवी भोज, सरचिटणीस प्रज्ञा घडशी, महिला उपाध्यक्ष अंकिता शिगवण, मीरा जावळकर, सायली इचले, सह्याद्री शिवकन्या कार्याध्यक्ष रिया घडशी, कात्रज विभाग अध्यक्ष हरिश्चंद्र दरडे, पर्वती विभाग अध्यक्ष रोशन ओकटे यांच्यासह शहर व विभागातील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले होते.

या रक्तदान शिबिरात महिला आघाडी तसेच सह्याद्री शिवकन्या युवती आघाडीतील महिलांनी विशेष उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अनेक महिला व शिवकन्यांनी रक्तदान करून मानवसेवेच्या कार्यात योगदान दिले, ही या शिबिराची विशेष बाब ठरली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संतोष रामाणे यांनी मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×