Breking News
आषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान; शासन निर्णय जारीशालेय साहित्य खरेदी आणि चतुर्थीनिमित्त गर्दीलूटमार करणारा सराइत गजाआड..विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून शासनाचे सर्वतोपरी सहकार्य-दादाजी भुसेशिक्षकांचा गुणवत्तेचा दर्जा वाढविण्याकरीता प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. नीलम गोऱ्हेशिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे-उपमुख्यमंत्री अजित पवारमोलकरीणीने लांबवले साडेतीन लाखांचे दागिने लंपासतत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हादुबईत ओैषध निर्यात करण्याची बतावणीज्वेलर्सचा दरवाजा तोडून १५ लाखाांचा ऐवज लंपास

क्रेडीट कार्ड योजनेच्या नावाखाली जेष्ठाची १० लाखांची फसवणूक

क्रेडीट कार्ड योजनेच्या नावाखाली जेष्ठाची १० लाखांची फसवणूक

अज्ञात मोबाइलधारकासह सायबर चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – बँक अधिकार्‍यांसाठी खास क्रेडीट कार्ड योजना असल्याचे सांगून, सायबर चोरट्याने एका जेष्ठ नागरिकाकडून बँकखात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर त्यांना एपीके फाईल पाठवून फाईलला क्लिक करण्यास सांगून तब्बल ९ लाख ४६ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. ही घटना ९ ते १६ मे कालावधीत कोथरूड परिसरात घडली आहे. याप्रकरणी ६९ वर्षीय नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाइलधारकासह सायबर चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.

जबरी चोरीप्रकरणी ५ महिन्यांपासून फरार आरोपीला बेड्या; भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक कोथरूडमध्ये राहायला असून, ते बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. ९ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून बँक अधिकार्‍यांसाठी खास क्रेडीट कार्डची योजना असल्याची बतावणी केली. सायबर चोरट्याने पाठविलेल्या अ‍ॅडला क्लिक करण्यास सांगून माहिती भरण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर कार्डसाठी व्हेरिफिकेशन महत्वाचे असल्याचे सांगून त्यांच्याकडून बँक खात्याची संपुर्ण माहिती सायबर चोरट्याने घेतली.

त्यांचा विश्वास संपादित करून सायबर चोरट्याने व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर एपीके फाईल पाठविली. संबंधित फाईलला क्लिक करण्यास सांगून ऑनलाईनरित्या ९ लाख ४६ हजारांची फसवणूक केली आहे. बँक खात्यातून रक्कम वजा झाल्याचा मेसेज आल्यानंतर तक्रारदारांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top