Breking News
सैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानासाठी विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे ठोस पाऊल – आयुक्त पुलकुंडवारजिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यातलायन्स क्लब पूना शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश खामगळ यांची निवड‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-2026’द्वारे पुणे व महाराष्ट्रातील पर्यटन क्षमता आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्शविण्याची संधीटिळक रोड वरील विसर्जन मिरवणूक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने वेळेआधी संपविण्याचा प्रयत्न करू..क्रिप्टो करन्सीमध्ये ३०० टक्के नफ्याचे दाखविले आमिषमौजमजेसाठी दुचाकी चोरणारे गजाआडपुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छादट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यूमंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुण्यात डिलिव्हरी बॉयला पिस्तूल लावून लुटले

पुणे रेल्वे स्टेशनमधील घटना ६९ लाख ७१ हजारांचा ऐवज चोरून नेला

marathinews24.com

पुणे – सोन्याचे दागिने जमा करण्यासाठी मुंबईतुन पुण्यात आलेल्या डिलिव्हरी बॉयच्या कमेरला पिस्तूल लावून त्याच्याकडील असलेले दागिन्यांचे पार्सल दोघांनी जबरदस्तीने चोरून नेले. पार्सलमध्ये तब्बल ६९ लाख ७० हजार ३६८ रुपयांच्या सोन्याचा ऐवज. याबाबत अंबे एक्स्प्रेस लॉजेस्टिक कंपनीचे व्यवस्थापक प्रथमेश माने (वय २८, रा. अंधेरी) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनसमोर बुधवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली आहे.

जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबे एक्स्प्रेस लॉजेस्टिक कंपनी ही जय मनोहरलाल कोठारी आणि मनोहरलाल भवरलाल कोठारी यांच्या मालकीची आहे. संबंधित कंपनी सोने, चांदी व डायमंड ज्वेलरी पोहोचवण्याचे काम करते. मुंबईतून कंपनीकडे ६९ लाख ७० हजार ३६८ रुपयांचे सोन्याचे दागिने असलेले ८ पार्सल पुण्यातील शाखेत पोहचवण्याचे काम तरुणाला देण्यात आले होते. कंपनीचा कर्मचारी हे पार्सल घेऊन मुंबईहून रेल्वेने पुण्यात आला.

तो पुणे रेल्वे स्टेशनला उतरून स्टेशन बाहेर आल्यानंतर दोघा जणांनी त्याला पिस्तूलाचा धाक दाखवला. मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील ८ पार्सल जबरदस्तीने काढून घेतले. घाबरलेल्या कर्मचाऱ्याने ही माहिती मॅनेजर प्रथमेश माने यांना फोन करून कळवली. माने यांनी तातडीने पुण्यात येत, बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले, पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीमध्ये दोघेजण कर्मचाऱ्याच्या शेजारी दिसत आहेत. त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला दिसून येत आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top