Breking News
डीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषण

व्यावसायिक केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपींना लोहगडावर नेऊन चौकशी

व्यावसायिक केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपींना लोहगडावर नेऊन चौकशी

पोलिसांकडून ‘सीन रिक्रएशन’

marathinews24.com

पुणे – व्यावसायिक केतन अगरवालची हत्या प्रकरणात केतनची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना रविवारी सकाळी लोहगडावर नेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पुनर्रचना (सीन रिक्रएशन) करण्यात आली. केतन अगरवाल हत्या प्रकरणात त्याची नियोजित पत्नी केतन आणि चेतन यांनी समाज माध्यमांवर माहिती शोधल्याचे पोलीस तपासात उघड झाले सिया केतनला घेऊन १४ जूनला लोहगडावर गेली असताना, तिने केतनला दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे तिने चेतनची मदत घेतली,’ अशी माहिती तपासात मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिष; ज्येष्ठाची १ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी 

आरोपी चेतन आणि सिया वडगाव मावळ न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सध्या पोलीस कोठडीत आहेत. दोघांना सोमवारपर्यंत (२९ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोपी सिया गोयलच्या आई-वडिलांची शनिवारी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चौकशी केली. सियाच्या भावाची शुक्रवारीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या आई वडिलांची शनिवारी चौकशी करण्यात आली. त्यानंतर रविवारी सकाळी सिया आणि चेतनला घेऊन पोलिसांचे पथक लोहगडावर गेले. घटनास्थळाची पाहणी पोलिसांनी केली. दोघांची घटनास्थळी चौकशी करण्यात आली. घटना नेमकी कशी घडली, तसेच घटनाक्रमाची माहिती पोलिसांनी घेतली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

केतन याचा सिया आणि चेतन यांनी १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून खून केला. याप्रकरणी अगरवाल कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर पाेलिसांनी तपास करून खुनाचा छडा लावला. पोलिसांना संशय येऊ नये याची दोघांनी काळजी घेतली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×