Breking News
Mahatma Jyotirao Phule : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे आवाहनKharadi Bypass Robbery Case : पादचारी जेष्ठेच्या अंगावर पाणी उडवून लुटलेLost Mobile Recovery : वाघोली पोलिसांनी तक्रादारांच्या चेहर्‍यावर फुलवले हसूPune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटनाBopdev Ghat Car Accident : बोपदेव घाटात वाहनाच्या धडकेत मोटार दरीत कोसळलीSugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रम

AI Public Services Maharashtra : सेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह कामकाजासाठी एआयचा प्रभावीपणे वापर करा- राज्य आयुक्त सुधाकर तेलंग

AI Public Services Maharashtra

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक संपन्न

marathinews24.com

पुणे – AI Public Services Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सेवा वितरण प्रक्रिया गतिमान करावी, असे निर्देश सेवा हक्क आयोगाच्या पुणे विभागाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिले.

देहू नगरपंचायतीमार्फत घाट परिसर व संत तुकाराम महाराज मंदिराची स्वच्छता – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवांच्या अंमलबजावणीबाबत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आयोगाच्या उपसचिव अनुराधा खानविलकर, मुख्य अभियंता अनिल पवार, सहायक मुख्य अभियंता राजु ठाणगे, दिपाली वाणी यांच्यासह पुणे विभागातील संबंधित जिल्ह्याचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

तेलंग म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विहीत कालमर्यादेत सेवा उपलब्ध करुन दिल्याने नागरिकांमध्ये शासनाविषयी सकारात्मक दृष्टीकोन रुजण्यास मदत होते. शासकीय कार्यालयात न येता घरपोच सेवा मिळत असल्याने त्यांचा वेळ, इंधन आणि खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्याअंतर्गत प्राप्त होणारे अर्ज, त्याची छाननी प्रकिया, प्रलंबित प्रकरणांचे विश्लेषण, कालमर्यादा संपण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना, तक्रारींचे वर्गीकरण तसेच सेवा वितरणातील त्रुटी ओळखण्यासाठी एआय आधारित प्रणालींचा वापर करण्यावर भर द्यावा.

ते पुढे म्हणाले, उपलब्ध तंत्रज्ञानाचा अभ्यास करून नागरिकाभिमुख सेवा अधिक सुलभ करण्यावर भर दिला पाहिजे. नागरिकांना सेवा मिळविण्यासाठी अनावश्यक विलंब होऊ नये, प्रत्येक अर्जाचा वेळेत निपटारा व्हावा आणि सेवा वितरण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात.

AI Public Services Maharashtra सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सेवांबाबत समाधान व्यक्त करुन ते पुढे म्हणाले, आपले सरकार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोर्टलवरील सेवा तपशील सारखा असला पाहिजे. ऑफलाईन अर्ज आल्यास शक्य तितक्या लवकर ऑनलाईन करुन घ्यावे. ऑनलाईन अर्ज करतांना कागदपत्राची पूर्तता झाल्याशिवाय अर्ज स्वीकरला जाणार नाही, यामुळे प्रलंबित अर्ज कमी होण्यास मदत होईल. कंत्राटदारांना देण्यात येणारे परवाना पडताळणीकरिता प्रणाली विकसित करावी. शक्यतो क्युआर कोड आधारित प्रमाणपत्राचे वितरण करण्यावर भर द्यावा. प्रमाणपत्र नुतनीकरण प्रक्रिया ‘स्वयं नूतनीकरणʼ करण्याच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना तेलंग यांनी दिल्या.

यावेळी ठाणगे यांनी संगणकीय सादरीकरण केले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा, प्राप्त व प्रलंबित अर्जांचा, सेवा देण्यासाठी निर्धारित कालावधीचा तसेच अर्जांच्या निपटाऱ्याच्या सद्यस्थितीची माहिती त्यांनी बैठकीत दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×