Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न

५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न

दोघे जण अटकेत

marathinews24.com

पुणे – पाचशे रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे जण चहा विक्रेत्याच्या प्रसंगावनाधामुळे पकडले गेले. ढोले-पाटील रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी दोघांना अटक केली. ओमप्रकाश महावीर अगरवाल (वय ३२, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी), मौसम नरेंद्र मिश्रा (वय ३६, रा. लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सिद्धराम अशोक बिदनकर (वय २५, रा. ताडीवाला रस्ता) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकाची चाकू भोसकून हत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिदनकर यांचे ढोले पाटील रस्त्यावर चहा विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी (१९ जून) दुपारी तीनच्या सुमारास अगरवाल आणि मिश्रा हे बिदनकर यांच्या जयमल्हार टी स्टाॅलवर आले. बिदनकर यांच्या आईला पाचशे रुपयांची बनावट नोट देऊन सिगारेट खरेदी केली. बिदनकर यांच्या आईच्या निदर्शनास बनावट नोट दिल्याचा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी मुलाला माहिती दिली. आरोपींनी याच परिसरातील एका दुकानात पाचशे रुपयांची बनावट नोट देऊन सिगारेट खरेदी केली होती. त्यानंतर बिदनकर यांनी त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली.

कोरेगाव पार्क पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अगरवाल आणि मिश्रा यांना ताब्यात घेतले. बनावट नोट चलनात आणल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींनी पाचशे रुपयांची बनावट नोट कुठून आणली? यादृष्टीने पाेलिसांकडून तपास करण्यात येत आहे. आरोपींनी बनावट नोट चलनात आणून फसवणूक केल्याचे आणखी काही प्रकार केले आहेत का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×