Breking News
मनसेच्या आंदोलनानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यानी कंत्राटदाराला झापलेदुचाकीवर गांजाविक्रीचा प्रयत्ननागरिककेंद्रित विकासातून शाश्वत विकासाला गती द्या – मुख्य सचिव राजेश अग्रवालपुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्धगणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तगुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची १५ लाखांची फसवणूकज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावी

गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची १५ लाखांची फसवणूक

गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची १५ लाखांची फसवणूक

बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – खासगी कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नितीन कुलकर्णी (वय ५१, रा. डहाणूकर काॅलनी, कोथरूड), शिरीष देशपांडे (वय ५७, रा. श्रेयनगर, छत्रपती संंभाजीनगर), गोकुळ थोरात (वय ५२, रा. छत्रपती संभाजीनगर), अक्षय गर्ग (वय ३५, रा. धानोरी, विश्रांतवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४४ वर्षीय महिला बंडगार्डन रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. आरोपींशी त्यांची अडीच वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपींनी त्यांना खासगी कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर महिलेने त्यांच्या खात्यात वेळोवेळी १५ लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौगुले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×