Breking News
मनसेच्या आंदोलनानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यानी कंत्राटदाराला झापलेदुचाकीवर गांजाविक्रीचा प्रयत्ननागरिककेंद्रित विकासातून शाश्वत विकासाला गती द्या – मुख्य सचिव राजेश अग्रवालपुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्धगणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तगुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची १५ लाखांची फसवणूकज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावी

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

marathinews24.com

पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी आज, दि. ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त – सविस्तर बातमी 

पुणे जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ९० लाख ८० हजार १७३ मतदारांची नोंद होती. या कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार ६२ लाख १३ हजार ६९२ इतके मतदार नोंदणी झाली आहे. यामध्ये ३१ लाख ५१ हजार २९७ पुरुष तर ३० लाख ६२ हजार १२ महिला व ३८३ तृतीयपंथी मतदार नोंदणी झाली आहे.

मतदान केंद्रांमध्ये ७ ने वाढ होऊन आता ८ हजार ४२४ मतदान केंद्र झाली आहेत. यामध्ये जुन्नर ३५६ आंबेगाव ३४४ खेड आळंदी ३९३ शिरूर ४५९ दौंड ३१५ इंदापूर ३३९ बारामती ३८८ पुरंदर ४१३ भोर ५६७ मावळ ४०२ चिंचवड ५६० पिंपरी ३९७ भोसरी ४९१ वडगाव शेरी ४३८ शिवाजीनगर २६६ कोथरूड ३८७ खडकवासला ५०२ पर्वती ३४४ हडपसर ५२५ पुणे कॅन्टोन्मेंट २७० कसबा पेठ २६८ असे एकूण ८ हजार ४२४ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

एएसडीडी यादीनुसार २८ लाख ६६ हजार ४८१ गणना अर्ज अनकलेक्टटेबल मतदार आहेत. त्यातील एक लाख ४३ हजार ९७५ दुबार, ३ लाख १२ हजार ४८ मयत, १७ लाख ८३ हजार ५८ अनुपस्थित, ५ लाख ९१ हजार ३८ स्थलांतरित व ३६ हजार ३६२ इतर मतदार आहेत.

प्रारूप मतदार यादीतील ६२ लाख ११ हजार ९५० मतदारांपैकी ५ लाख ७७ हजार ८२१ विसंगती तर ७ लाख ५४ हजार ५९७ मॅपिंग न झालेले अशा एकूण १३ लाख ३२ हजार ४१८ सुनावण्या होतील.

या यादीमध्ये नाव नसल्यास प्रपत्र क्रमांक ६ भरुन नव्याने मतदार नोंदणी करावी. तसेच यादी नावामध्ये आक्षेप असल्यास प्रपत्र क्रमांक ७ भरुन आक्षेप नोंदविता येणार आहे. ईपीक कार्ड करिता प्रपत्र क्रमांक ८ भरता येईल आणि मतदार यादीमध्ये दुरुस्ती देखील करुन घेता येईल.

प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट मतदारांच्या तपशिलात तफावत आढळल्यास तसेच २००२ च्या मतदार यादीशी ज्यांचे मॅपिंग झालेले नाही (No Linkage), अशा मतदारांसाठी संबंधित यादी भागाच्या सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या स्तरावर सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीनंतर संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करायचे किंवा नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती सादर करता येतील. दावे व हरकतींवर दि. ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कार्यवाही करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in संकेतस्थळावर ही यादी पाहता येणार आहे. याशिवाय, प्रारूप मतदार यादी भारत निवडणूक आयोगाच्या ECINET आणि Voter Service Portal वरही उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×