Breking News
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकार

बलुतेदार सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार

Balutedar Cooperative Societies

खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, संस्थांच्या प्रश्नांवर पुण्यात राज्यस्तरीय बैठक

marathinews24.com

पुणे – Balutedar Cooperative Societies : महाराष्ट्र राज्यातील बलुतेदार सहकारी संस्थांना सक्षम करणे, त्यांच्या समस्या सोडविणे आणि कारागिरांसाठी रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आर्यन पंप्सच्या ग्लोबल डिझाइन आणि इनोव्हेशन सेंटरला भेट – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र राज्य सहकारी प्रशिक्षण संस्था, पुणे येथे महाराष्ट्र बलुतेदार सहकारी फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभापती रवींद्र साठे म्हणाले, की महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यात बलुतेदार सहकारी संस्था या मंडळाचा कणा असून, त्या मंडळाचा अविभाज्य भाग आहेत. या संस्थांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. संस्थांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून आर्थिक विकासापासून वंचित असलेल्या घटकांच्या उन्नतीसाठी एकत्रितपणे काम करावे.

माजी विधान परिषद सभापती विठ्ठलराव सखाराम पागे (वि. स. पागे) यांच्या पुढाकारातून कारागीर रोजगार हमी योजनेची संकल्पना पुढे आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यात १९७२ पासून तालुका आणि ग्रामीण स्तरावर बलुतेदार सहकारी संस्थांच्या माध्यमातून कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. या संस्थांचे कार्य अधिक सक्षम करण्यासाठी मंडळाच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. राज्यातील सर्व बलुतेदार सहकारी संस्थांची परिपूर्ण माहिती मंडळाकडे सादर करावी. तसेच संस्थांची सद्यःस्थिती, अडचणी आणि आवश्यक सहकार्य याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आवाहन सभापती रवींद्र साठे यांनी केले.

विशेष घटक व मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनांचा लाभ देणार – मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत

बलुतेदार सहकारी संस्था तळागाळातील गरजू, वंचित आणि मागास कारागिरांसाठी महत्त्वाचे काम करतात. या संस्थांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या समस्या शासनस्तरावर मांडून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले.

कारागिरांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी वाढविण्याकरिता मंडळाच्या विशेष घटक योजना आणि मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेच्या माध्यमातून संस्थांना पुन्हा सक्षम करण्यावर भर देण्यात येईल. तसेच संस्थांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी मंडळातील उद्योग पर्यवेक्षकांना सहकार्य करण्याबाबत आवश्यक निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील बलुतेदार सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, त्यांच्या कामकाजातील अडथळे आणि संस्थांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग, हातकागद विभागाचे अमर राऊत तसेच महाराष्ट्र बलुतेदार सहकारी फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या बलुतेदार सहकारी संघांच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्र बलुतेदार सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष पाटोळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्री. कुंभार यांनी केले, तर अंकुश आंबेकर यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×