Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Baramati Heavy Rain News : नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Baramati Heavy Rain News

बारामती शहरासह तालुक्यातील पावसाचा आढावा

marathinews24.com

मुंबई – Baramati Heavy Rain News : बारामती शहरासह तालुक्यातील काही भागांत सोमवारी (दि.२) पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली. बारामती शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही सखल भागांत, विशेषतः भिगवण रोड परिसरात पाणी साचले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

युवा उद्योजकांमधूनच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल– सुनील फुलारी – सविस्तर बातमी 

बारामती शहर परिसरात साधारण १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले असले, तरी कोणतीही पडझड अथवा जीवित-वित्तहानी झालेली नाही. (Baramati Heavy Rain News) तसेच सध्या पूरस्थितीचा कोणताही धोका नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिली. शहरातील भिगवण रोडसह ज्या भागांत पाणी साचले आहे, त्या ठिकाणी तातडीने पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर आणून जनजीवन सुरळीत सुरू राहील, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे सतर्क राहावे. आवश्यक ती आपत्कालीन यंत्रणा आणि मनुष्यबळ सज्ज ठेवावे. शहरासह तालुक्यातील पावसाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक ग्रामस्थांना, नागरिकांना तसेच प्रवाशांना त्रास होता कामा नये. त्यांच्या सुरक्षिततेला आणि जनजीवन सुरळीत ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

बारामती शहर आणि तालुक्यात पावसामुळे झालेल्या संभाव्य नुकसानीची संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. परिस्थितीवर प्रशासनाने बारकाईने लक्ष ठेवून नागरिकांना तातडीने दिलासा मिळेल, अशा पद्धतीने कार्यवाही करावी, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×